मोहरीच्या रानामध्ये रंग हळदीचा खुले
वारियाच्या झुळकीने मोहरली फुलेफुले
कोण बरे जाई पुढे घडवुनी पायवाट
रंग मातीचा मनात लोचनात स्वप्न घाट
रान सारे हासणारे पुढे शांत हिरवाई
तिथे असावी झोपडी अंगणात जाई जुई
किलबिल पाखरांची मोद हसे ठाई ठाई
मोहरीच्या रानामध्ये रंग हळदीचा खुले
वारियाच्या झुळकीने मोहरली फुलेफुले
कोण बरे जाई पुढे घडवुनी पायवाट
रंग मातीचा मनात लोचनात स्वप्न घाट
रान सारे हासणारे पुढे शांत हिरवाई
तिथे असावी झोपडी अंगणात जाई जुई
किलबिल पाखरांची मोद हसे ठाई ठाई