घडविती सौंदर्य सारे हात सुंदर
लाभली धरणीस त्यांची साथ सुंदर
अंगुली रंगात भिजुनी कृष्ण होता
भावली गगनास त्यांची जात सुंदर
माळुनी हृदये फुलांची स्वप्नवेडी
धावतो रानात वेडा वात सुंदर
या भुजांनी खोदल्या विहिरी मनातिल
उसळते त्यातून पाणी गात सुंदर
अंतरातिल वादळाला तोंड देण्या
तळपते ही लेखणीची पात सुंदर
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा.