अमोघ माझा धीर असा
सुवर्णपाती तीर जसा
असेल बिंदू लक्ष्य जरी
अचूक भेदे मीर तरी
करात नाही शस्त्र गदा
लढेल ऐसा वीर सदा
खणेल कोणी खाण तिथे
झरेल वाणी नीर इथे
विवेक सिंधू साठवितो
जलातले तो क्षीर पितो
स्फुरेल ज्याला मंत्र जगा
असाच वेडा पीर हवा
वृत्त – ल गा ल गा गा, गा ल ल गा
One response to “असाच वेडा पीर हवा – ASACH VEDA PEER HAVA ( want crazy devoted lover just like this..)”
वाह