पुन्हा पुन्हा यावी दारी पावसाची सर
चिंब चिंब व्हावे पुन्हा मन सैरभैर
अंगणात चिमण्यांनी धिंगाणा घालावा
आई आई म्हणताना जीव वेडा व्हावा
येशीलका आई घरी होउनीया परी
दादांसवे गप्पागोष्टी करावया घरी
रांधेन मी तुझ्यासाठी मऊ भात खीर
दादांसाठी लढावया होईन मी वीर
आई दादा कुठे आता असाल जगात
जिथे आहे तिथे तुम्ही असाल सुखात…