बोला आता खरे खरे – BOLAA AATAA KHARE KHARE


मुदत संपली लपवायाची बोला आता खरे खरे
सांगुन सांगुन दमलो चिडलो सत्यच सांगा खरे खरे

कशास केली लपवाछपवी भले कुणाचे करावया
अता न कुठली वाट तुम्हाला इकडे तिकडे पळावया

चारित्र्याचा मिरवित तोरा फिरला तुम्ही इथे तिथे
चारित्र्याची ‘असली’ व्याख्या तुम्हा कळाली कधी कुठे

भ्रमात भिजवुन बुद्धी अपुली काय जाहले जीवाचे
अहंकार अन हवस मनाची लाड पुरविते देहाचे

डिवचुन टोचुन मने दुखवुनी खिदळलात हो किती किती
बनुन आंधळे वार कराया का न वाटली तुम्हा भीति

अता तरी व्हा पुरते जागे सुधारण्या घर अपुले हे
विटलो पुरते ऐकुन ऐकुन जर तर पण पण तुमचे हे

शेवटची ही तुम्हास संधी मूर्खपणा हा बंद करा
अथवा जाऊ पाठ फिरवुनी करू आमुचा शब्द खरा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.