तू अन मी – TOO AN MEE (you and me)


अता तुझी ना आठवण येते
तुझ्यात दडल्या अनेक ‘तू’ची
कधीकधी पण आठवण येते

नकळत झाली भेट तरीही
नजर भिडविली कधी जरीही
आठवुन ना पण धडधड हृदयी
केव्हातरी मी तुजला बघते
अता तुझी ना आठवण येते

नाजुक साजुक गुपिते गोष्टी
उघडुन मम प्रेमाची सृष्टी
कधी न होते दुःखी कष्टी
सत्य कळावे फक्त वाटते
अता तुझी ना आठवण येते

दुःख कुणाला कुणीन द्यावे
प्रेमच द्यावे प्रेमच घ्यावे
वासनेत पण कधी न बुडावे
हुरहूर मिटण्या गीते लिहिते
अता तुझी ना आठवण येते

तुझी मला ना आठवण येते
तुझ्यात दडल्या तू अन मी ची
कातरवेळी आठवण येते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.