आज वाटते पाऊस यावा
माझ्याहुनही चिंब भिजावा
थेंब टपोरे मौक्तिक झरझर
केसांतुन यावे गालावर
जुनी पुराणी छत्री तरीही
पुन्हा धरूया तिज डोईवर
तशात येता सुसाट वारा
वेचाव्या छत्रीतच धारा
हातगाडीशी थांबुन क्षणभर
कणसे खावी चोळुन मिरपुड
रस्त्यावरती पाणीच पाणी
गाऊ रचुया पाऊस गाणी
येईल पाऊस येईल पाऊस
रडविण्यास त्या वेड्या भाऊस