वेध तुझ्या यात्रेचे मज अता लागले रे
दर्शनास आतुर डोळे साद ऐकते रे
एक एक पाउल उमटत,असे वाज वाजे
संगतीस प्रियजन त्यांची गाज जाहले रे
निळ्या डोंगराच्या रांगा नभा वेढणाऱ्या
गाठण्यास टोके सुंदर गात चालले रे
पल्लवीत हिरव्या राया मोहरून आल्या
आम्र मंजिरी मी मजला झुळुक चुंबते रे
सुनेत्रात भरुनी घेउन स्वरुप आत्मदेवा
तुझे भाव टिपण्यासाठी मला गायचे रे
गझल मात्रावृत्त – मात्रा २४