हाण चार थोबाडावर
हाण मार थोबाडावर
पाचवीस जो तू पुजला
हाण जार थोबाडावर
गुंफ मोगरा वासाचा
हाण हार थोबाडावर
रंग बदलु गिरगिट सरडे
हाण ठार थोबाडावर
लाव दीप नालीपाशी
हाण बार थोबाडावर
बेवड्यास पाजुन सरबत
हाण सार थोबाडावर
गात न्हात खाण्यासाठी
हाण वार थोबाडावर
खाज ज्यास सुटते राजस
हाण खार थोबाडावर
तेच षंढ छक्के आले
हाण दार थोबाडावर
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १४)
लगावली – गालगाल/गागागागा/