शब्द माझे सारथी अन शब्द माझे धन खरे हे
शब्द माझे सारथी अन शब्द माझे बल खरे हे
स्वच्छ करण्या मार्ग माझा हृदय माझे बिघडलेले
शब्द माझे सारथी अन शब्द माझे जल खरे हे
भेदण्या लक्ष्यास अवघड गाठण्या मंझिल नव्याने
शब्द माझे सारथी अन शब्द माझे शर खरे हे
चुंबण्या आकाशगंगा डुंबण्या पाण्यात निळसर
शब्द माझे सारथी अन शब्द माझे पर खरे हे
द्यावया शांती मला मम् लेखणीला वळण सहजी
शब्द माझे सारथी अन शब्द माझे घर खरे हे
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २८)
लगावली – गालगागा/ ४ वेळा