बियाणे – BIYAANE


पिकवीन सोनं मी गझलेच्या जमिनीमंदी
झिजवीन जोडं मी गझलेच्या जमिनीमंदी

रचून पोती शब्दधनाची येता गाडी
अडवीन गाडं मी गझलेच्या जमिनीमंदी

पेरायाला नक्षत्रांचे खरे बियाणे
उसवीन पोतं मी गझलेच्या जमिनीमंदी

प्रीती भक्ती शक्ती माझी सफल व्हावया
उधळीन दाणं मी गझलेच्या जमिनीमंदी

पाडायाला सरी मोतिया रिमझिम झिमझिम
बसवीन जातं मी गझलेच्या जमिनीमंदी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.