मी न घालते नियम दुजावर
बंधन घाले मी माझ्यावर
माझा संयम प्रिय प्रिय मजला
माझ्या सौंदर्यावर भुलला
अस्त्र लेखणी भेदुन लक्ष्या
जाळ्यामध्ये पकडे भक्ष्या
शस्त्र लेखणी फिरे मनावर
काळी शाई झरते झरझर
जलद सावळा बरस बरसतो
भाव भावना झिमझिम झरतो
अक्षर अक्षर उजळत जाते
त्यात लख्ख ब्रह्मांड झळकते