परिसर सुंदर नयनमनोहर
तेथे मनभावन जिनमंदिर
रम्य वाट मज तिथे नेतसे
खाली भूमी वरती अंबर
वाजविता हाताने घंटा
मंजुळ घुमतो नाद शुभंकर
गर्भगृही स्थापित जिनप्रतिमा
दर्शन घेता पावन अंतर
प्रसन्न होता मम मनमंदिर
वाट घरी मज नेई झरझर
गझल मात्रावृत्त (मात्रा १६)