अधर सहज मिटलेले
रेषेवर जुळलेले
आघात न कसलाही
प्रतिघातच उठलेले
पर्णांचे शुष्क थवे
वाऱ्यावर उडलेले
पानातुन तांबुस दो
मौन तुझे हसलेले
स्वप्नातच स्वप्न जणू
नवल खरे घडलेले
क्षितिजावर सांज उभी
अत्तर घन झरलेले
गा गा गा गुणगुणता
उत्तर मज सुचलेले
जगण्याची आस नशा
जीव जगी रमलेले
नीर सुनेत्रात पुन्हा
पापण दल हललेले