ध्यानात खोल जाता
आत्म्यात जिन दिसावा
कुसुमांसवे कळ्यांनी
पानांस रंग द्यावा
झरता झरा उन्हाचा
डोळे मिटून प्यावा
जग शांत चित्त होता
वारा पिऊन घ्यावा
निजल्यावरी मनाला
झोका हळूच द्यावा
स्वप्नात माय येता
चाफा फुलून यावा
शब्दात तव सुनेत्रा
मृदु भाव मी भरावा