व्हॉटसॅपचे डोके आणिक, फेसबुकची काठी..
क्षमा मार्दवाची मम हाती, एक कलमी लाठी.
धरा हवा अन जलधारा, दहा दिशा गातात
दशलक्षण धर्माचे नाणे, खणखणतेय गाठी.
आर्जव शुचिता सत्य संयमे,अहितकर त्यागाया..
अकिंचन्य अन ब्रह्मचर्य ही,असूदे परिपाठी.
क्षमावणीला पर्व समाप्ती,त्यागु शंका-शंका..
धर्म अहिंसक मर्म जाणतो,वर्म बुद्धी नाठी..
फेसबुकची तोलाया विटी,व्हॉटसपचा दांडू..
पर्यूषण पर्वातिल लोपी, पूज्य माझिया पाठी..
ईश्वर अल्ला सिद्ध जिनेश्वर,अणु रेणु परमाणुत..
फिरे लेखणी अक्षर झरझर,मीच हाय तलाठी..
नाव ‘ सुनेत्रा ‘ मक्त्यामध्ये,पाच शेर परमेष्ठि..
आत्मगुरू सत् अंतर्यामी,लढतो जीवासाठी.