अर्ध्या हळकुंडाने ते का पिवळे झाले होते
बाकी काही नसले तरिही भरून आले होते
भरून अंतर गदगद होता प्याल्यावर प्याले
थरथरत्या बोटांनी गझलाअजून प्याले होते
जमिनीवरच्या सरपटणाऱ्या रांगा टाळायाला
हवा खेळवुन फुफ्फुस भरता उंच उडाले होते
टिम्ब टिम्बच्या रांगोळीवर मुक्त हस्त मम फिरता
बरसायाला जलद त्यावरी जलद निघाले होते
पुन्हा नवा मी मक्ता गुंफुन नाव सुनेत्रा लिहिता
ओळीवरती त्याच जुन्या मी तरुन बुडाले होते
तरही गझल ..गझलेची पहिली ओळ कवी रघुनाथ पाटील यांची