पुफ्फ – PUFFA


🌺 काल जाता जाता एक गीत लिहीत मी गेले
काल परवाची गोष्ट गीतातून भरे प्याले 🌺

🌺 प्याले म्हणू वा ते पेले जरी काचेचेच होते
त्याला चषक म्हणता नाजुक किणकिणले 🌺

🌺 अष्टक्षरी ओवली मी करू अष्टक मंदिरी
तबकात अष्टद्रव्ये पूजेसाठी सजविली 🌺

🌺 नीर प्रासुक अक्षत गंध चंदनी खोडाचा
सुगंधित पुफ्फ शुभ्र चरु खडीसाखरेचा 🌺

🌺 दिव्व धूप फल भाव शुद्ध शुद्ध सिद्ध जिना
अर्घ्य देते सुनेत्रा मी तुझ्या चरणाशी देवा 🌺


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.