सुज्ञास सांगणे नलगे
कर्मास लाभते फळ गे
मोकाट वाहती नळ गे
धारेत गाडगे भर गे
ज्ञानेश ग्यानबा ज्ञानी
देतात प्यायला जल गे
गागाल गालगा गागा
लघु दोन गुरुसवे चल गे
तेलात मोहरी खुलता
गालात छानसे खळगे
चल देव दर्शना जाऊ
भक्तीत जोडण्या कर गे
अंतरी झळकते सोने
रत्नत्रय हृदयी धर गे