साकार आत्मजेचा बांधा घटाव आहे
लेण्यांत मूर्तिजेला घडण्यास वाव आहे
सोंगे करून आपण दावू रुबाब त्यांना
निर्लज्ज भेकडांचा भेकड ठराव आहे
बळदांत साठवील्या धान्यास कीड भारी
बुडता पुरात बळदे त्यांचा लिलाव आहे
ते शिंपडून पाणी थाळी पुसून घेती
आत्म्यात पाहण्याचा त्यांना सराव आहे
आहेच मी सुनेत्रा दिलदार स्वाभिमानी
जीवास जीव देणे माझा स्वभाव आहे