राजा अपुला वजीर व्हावा नको बोलका पोपट रे
पंत उपाधी खरी खरी पण उपमा अस्सल खोपट रे
राणी अपुली राणी असुदे राजासंगे तृप्त सुखी
नको क्वीन चा वजीर हाजिर गा अंगाई थोपट रे
शुद्धमतीने गझल लिहावी साच्यामधली मूर्त नको
प्राकृत भाषा जिन वाणीची उधळे मिथ्या जो पट रे
ऋषी मुनींच्या ऋद्धी सिद्धी देव दिगंबर ग गणाधिश
क्षितिजाच्या रेषेवर लिहिते आकाशा तू हो पट रे
शब्द रोपटे मात्रा पाचच चारच धर लिहिता रोपटं
कर उच्चारण दीर्घ लिही पण शब्द काफिया रोपट रे
टिम्ब अनुस्वारासाठी अन दीर्घ कराया उच्चारण
गझल व्याकरण सहज प्राकृतिक जाण तिचा मी भो पट रे
वरवंटा पाटा खलबत्ता पुरण वाट वा मिरच्या तू
असाच संगमरवरी इमला मजला आवडतो पट रे
बुद्धीबळातिल माझ्या चाली मारत नसती प्याद्यांना
हत्ती घोडा लढे उंट ही जिंकाया कोको पट रे
पुरे जाहली शब्द चिकित्सा नीज सुनेत्रा शांतपणे
कर्मबंध तटतटा तुटाया धर्मा त्यांना धोपट रे