हे राजगुरुचे गाव सुद्धा खेड आहे
मम गझल बंधन जीव जपण्या थ्रेड आहे
असुदेत रे तव कातडीचा रंग काळा
पण रंग रक्ताचा तुझ्याही रेड आहे
हातात असुदे लेखणी तलवार जणु रे
आपण अता दावूच त्यांना आपली ए ग्रेड आहे
ब्रम्हांड पुरवी बालकांना माझिया जी
अदृश्य शक्तीची सुरक्षा झेड आहे
मम मान सुंदर मोरणीची शोभते मज
मानेवरी शाबूत अजुनी हेड आहे