माझ्या दुकानी सत्य कळते निर्जरेने
घाटात झटकन चाक वळते निर्जरेने
वळवीत मी पण शब्द गरगर मार्दवाने
भाषा क्षमामय कर्म फळते निर्जरेने
आहे करामत हीच माझ्या आर्जवाची
तपताच काया विघ्न टळते निर्जरेने
जीवास कोणाच्या न धोका पूर्ण खात्री
घामास गाळत नीर गळते निर्जरेने
गावे फुलांची विविध रंगी चिंब भिजली
पुण्यास पाहुन पाप पळते निर्जरेने