जाहली शेरास सव्वा शेरणी दाईच आई
धन्य पन्ना वाचलेली जाहली माझी रुबाई
मुक्तकाच्या चार ओळी गात लिहिते ना लगावे
गालगागा चार वेळा मी सुनेत्रा रे सवाई
गालगागा गालगागा गालगागा गालगाई
माळते कंठात कंठा लेखणी नाही कसाई
ठेवते शेरावरी ह्या पावशेरा शर्वरी मम
कंटकांनी वेढलेली पार करण्या खोल खाई
आठमध्ये दोन जादा मिळवता दाही दिशांनी
लाट नाही लोट आले बहरली मौनी तराई
रंगल्या रंगात भिजुनी वाळल्या पुन्हा दिशा या
कोणती आहे उगवती ओळखूदे उमल जाई
वेग प्राशावा ध्वनीचा गंध ओल्या भावनांचा
डुंबताना मार डुबकी दो सुनेत्री आज बाई