शांत मी खाऊन ठेचा
लालची खपवून ठेचा
भामट्या त्या ज्योतिषांच्या
कुंडल्या काढून ठेचा
वाळवूनी जर्द मिरच्या
देठ पण मोडून ठेचा
ठेच पायांनाच लागे
दगड ते शोधून ठेचा
पोळले तिखटात तळवे
घोटुनी वाटून ठेचा
फिरुन वरवंटा गळाला
ठेचतो लोळून ठेचा
काढल्या खस्ता सुनेत्रा
खावया पुरवून ठेचा