काढ्यात औषधाला सुद्धा कषाय नाही
घर सारवू कशाने गोठ्यात गाय नाही
भोके जरी खिशाला पॅंटी जुन्याच भारी
सदऱ्यास कोण येथे बांधीत टाय नाही
टाटा अजून टिकुनी गावी मिठामधेही
खुर्चीत कैद मंत्री पळण्यास पाय नाही
गाठीस पुण्य भावा अन पातळास ठिगळे
गावात गझल कट्टा पण वायफाय नाही
अभिजात मायबोली असुनी तुझी सुनेत्रा
तुझिया मराठमोळ्या गझलेस न्याय नाही