जाण डाव आडनाव गाव कोणते खरे
गूढ त्या शिवालयात बाव कोणते खरे
संगनमत संगणक न प्रीत शब्द जोडते
बेल पर्ण रंग भोर ताव कोणते खरे
दगड गुंड पावसात झिंग चिंब शेंदरी
वाळती उन्हात पिंड भाव कोणते खरे
रे स अर्थ काय रे रुमाल बीज मंत्र हा
पुरुष स्त्री कुणी असोत राव कोणते खरे
प्रश्न उत्तरातले सवाल ना जवाब हे
मंदिरात चढवले जडाव कोणते खरे
जंबुद्वीप वा विदेह क्षेत्र भरत इंडिया
मांडती महा मुनी लिलाव कोणते खरे
ही समज लगावलीच मोज फक्त अक्षरे
हाच सदनिका क्रमांक नाव कोणते खरे