कता ..
पथ्य पाळता कळते तथ्य जिवा
तथ्य जाणता गळते मिथ्य जिवा
सत्य प्रकटता असत्य गायब रे
धर्म अहिंसा पालन पथ्य जिवा
गझल…
पित्तासाठी मात्रा आहे सूतशेखर
स्मशानातले पळवून लावे भूत शेखर
जिनालयाच्या गाभाऱ्यातिल मूर्त शेखर
नाभीराज अन मरुदेवीचा पूत शेखर
मोक्षा गेला कैलासावर मुनि दिगंबर
निर्वाणाचा जणू भासतो दूत शेखर
कधी न अडके कुंडलीत हा दोषग्यांसम
शनी मंगळी राहू ना केतूत शेखर
मक्त्यामध्ये आठवणीने लिह सुनेत्रा
मम जमिनींचा सातबारा सबूत शेखर