धुके कपोती हवा गुलाबी निहार आहे
शिशिर ऋतू पण बनी शराबी बहार आहे
दवाळ बागा उले फुले केवडा सुगंधी
परिमल कैदी कळी शबाबी तिहार आहे
किती जरी घन तुझी लबाडी कुटील कपटी
तुज उडवाया हजरजबाबी प्रहार प्रहार आहे
तडाग भूवर गडद निळे जल दलात मिटल्या..
सजीव स्वप्ने दिवाण काबी न हार आहे
नवीन क्षुल्लक जिनागमातिल गझल सुनेत्रा
खलात कुटण्या सुमार बाबी पहार आहे