संकल्पाची जात असावी ठाम निश्चयी
संकल्पाला वात असावी राम निश्चयी
पुढच्या वर्षी करूच पुढचे आज आजचे
संकल्पासह बात असावी दाम निश्चयी
व्यवहाराने जगती जगता जीव जपाया
संकल्पातच मात असावी साम निश्चयी
भरून प्याला जसा सांडतो पुण्य तसे हे
संकल्पा तुज कात असावी घाम निश्चयी
कर्मनिर्जरा सहज सुनेत्रा अशी विशुद्धी
संकल्पावर पात असावी नाम निश्चयी