निर्झर झाला म्यूट कॅनॉल
कॅनल अथवा रूट कॅनॉल
खेचुन पाणी शेतीसाठी
भरून काढे तूट कॅनॉल
योनि गती की रोग असावा
यक्ष प्रश्न हा कूट कॅनॉल
दो जमिनींच्या मैत्रीमध्ये
नकोच पाडू फूट कॅनॉल
रत्नपारखी गुणानुरागी
मुनी दिगंबर क्यूट कॅनॉल
पूल बांधण्या कॅनल वरती
देय सुनेत्रा सूट कॅनॉल