फुका न वाजे नकार घंटा
गझल न माझी सुमार घंटा
लगाल गागा गतीत चाले
कुशाग्र बुद्धि तलवार घंटा
नव्हेच कासव नसे ससा पण
नसून भित्रा पगार घंटा
न माळ कवडी मिळे न फुटकी
जरी बडविल्या उधार घंटा
हुमान फुसके नकाच घालू
रुते कलेजी कट्यार घंटा
जिथे जिथे मम जिनालये ही
धरेल ठेका कुंवार घंटा
सुरेल गाणी तरुण गवळणी
तटावरी कृष्ण नार घंटा
उरात धकधक धडधड दिडदा
पडघम सरगम सतार घंटा
पुरे तमाशा गणात बोलू
करेल लत्ता प्रहार घंटा
नऊ जिनायतन वीण शाली
कशास टोप्या कतार घंटा
असहमतीतच कशी सहमती
म्हणेल भेंडी गवार घंटा
वय चवदाची गुणानुरागी
निनाद मंजुळ चिनार घंटा
शिवालयातिल पहाट परिमल
सळसळणारे शिवार घंटा
सभेत चर्चा मम गझलेची
उधाण भरती बहार घंटा
दिगंबराचे गुरू दिगंबर
वसन दिशांचे मिनार घंटा
समय सुनेत्रा उभी भगवती
ध्वजा तिरंगी किनार घंटा