तरही लिहील्यावर कधीही भ्यायचे नाही
श्रेयास दुसऱ्याच्या फुका लाटायचे नाही
झुंजार ही मम लेखणी लढते पिशाच्चाशी
खड्डा खणोनीया तिला गाडायचे नाही
वय जाहल्यावरती जरा संयम असावा हो
पचण्यास जे अवघड असे ते खायचे नाही
तरही डिलीट करून व्हावे मोकळे वाटे
ऐसे विकतचे दुःख मज ठेवायचे नाही
धर्मास ऐश्या पाळणे ज्याची नशा सम्यक
जगण्यात मिथ्यात्वा सुनेत्रा घ्यायचे नाही