शीक वाटण्या मुला चुलीत तू करायला
शीक भेद ना मुलामुलीत तू करायला
शीक दंभ ढोंग सोंग चीत तू करायला
शीक गझलचे सुलभ सुनीत तू करायला ..हुसने मतला
अक्षरांस जोडुनी कवीच शब्द बनवितो
शीक शब्द वळत गोल गीत तू करायला
आग कोंडुनी सदैव नेत्र लाल लाल हे
शीक उष्ण भावनांस शीत तू करायला
नेक काम फक्त प्रेम मस्त व्यक्त व्हावया
शीक धीर वीरता त्वरीत तू करायला
बैस देह तपवण्यास रापण्यास पाकळ्या
शीक चोरट्या मनास पीत तू करायला
वृत्त जे तुला जमेल ते बरे लिहावया
शीक ऑन लाइनीत प्रीत तू करायला
दोष का स्वतःतले उगाळशी पुन्हा पुन्हा
शीक सहज पद्धतीस रीत तू करायला
बूथ माजले उदंड कूट डाव साधण्या
शीक क्लिष्ट गंठणे लळीत तू करायला
सांग गोष्ट कागदास जीव शांत व्हावया
शीक हार पळवण्यास जीत तू करायला
काय देह काय स्वात्म रक्षिण्या उरे अता
शीक पूर्ण देह तव जळीत तू करायला
नयन शांत दर्शनात त्याग दृष्टि द्यावया
शीक भाव भोरता गळीत तू करायला
गाळगाल गाळगाळ गालगा लगावली
शीक मम सुनेत्र ए पुनीत तू करायला