जुन्या फायलींचे नवे बाड झाले
तुझे मूळ कारण तुला कांड झाले
तुला पावल्यावर बने बाहुली ती
गगन चुंबण्याला जरी माड झाले
तुझी लेक असुनी जणू लेक वाटे
लढायास कुस्ती किती जाड झाले
वसंतात भरले शिशीरात गळले
उभी वाळल्यावर सुके हाड झाले
धुके दाटल्यावर तुला ही दिसेना
फुपाटा असोनी म्हणे राड झाले
तुझे भुंकणे की नवी भूमिका ही
परस अंगणाचेच आखाड झाले
सुनेत्रा सई मां फई बेन ताई
मधुर जांभळाचे निळे झाड झाले