अबोली पटोला
भरजरी पटोला
नवलखे अलिकुले
किनारी पटोला
न घोला न अंचल
निळाई पटोला
गझल गझलियत स्वर
जपावी पटोला
गडद कुंकवासम
शबाबी पटोला
सळसळे शिवारी
बहारी पटोला
कनक जोडव्यांची
नव्हाळी पटोला
उन्हाळी फुलांची
हळदुली पटोला
हरित पल्लवीची
मखमली पटोला
निसुन्दी मनावर
मुरुकुला पटोला
न विंजन न वारा
भरारी पटोला
तराया तरोहण
तराफी पटोला
स्वरूनादबिंदे
समाही पटोला
नगर क्षेत्र उपवन
विदेही पटोला
करायास पाखा
भरावी पटोला
पहाटे दवाने
भिजावी पटोला
न बकरी न शेळी
कराग्री पटोला
विदेशी स्वदेशी
सवारी पटोला
कुटुंबास माझ्या
झळाळी पटोला
न घुसमट न बोथी
शिवपुरी पटोला
समोसरण भरले
तनूवर पटोला
लिपी संस्कृतीची
मम सही पटोला
सुनेत्राच आहे
खजांची पटोला
शब्दार्थ
पटोला… रेशमी वस्त्र
नवलखे ..नवलाईचे
अलिकुले …भुंगे
घोला ..घोळ, घेर
शबाबी … आंतरिक सौंदर्य
नव्हाळी … नवेपणा
अंचल … पदर
हळदुली ..हळदीत रंगलेली
निसुन्दी … निलाजरा, निर्लज्ज
विंजण …पंखा
मुरुकुला …स्मितहास्य
तरोहण ..तरण्याचे साधन
नादबिंदेस्वरू – अनाहत नाद
पाखा … अन्नदान
समाही …समाधी
बोथी …घुंगट
शिवपुरी …मोक्षस्थल
समोसरण … समवशरण
विदेही ..नेहमीसाठी पवित्र क्षेत्र
खजांची … खजिनदार