जखमा उरातल्या त्या होत्या जरी सुगंधी
मम जाण अंतरीची आहे खरी सुगंधी
म्हणतात पुष्प प्रेमी आकर्षणास प्रीती
प्रीतीत मोह जादा असते दरी सुगंधी
तांब्यातल्या जलाची तपताच वाफ झाली
शीतल झुळूक स्पर्शे आल्या सरी सुगंधी
मागेल मोल करणी पंचायती कुळांच्या
कुंदन मण्यात काळ्या धन घागरी सुगंधी
पावास चीज लोणी तडका तमालपत्री
मिसळीसवे कटाची शाही तरी सुगंधी
संदेश मेघनेचा घेऊन वीज आली
साकीसवे भराया पाणी घरी सुगंधी
शरपंजरी पडूनी लिहिलीय गझल गाथा
बाणेर बाणभट्टी कादंबरी सुगंधी
पाया क्षमावणीचा मूर्ती अचल चलासम
पृथ्वी फिरे स्वतःच्या आसावरी सुगंधी
आली पिके भराला कणसात जोंधळ्याच्या
सुख सावळे शिवारी तनु वावरी सुगंधी
भक्ती खऱ्या गुरूची ज्ञानास उजळवीते
तत्त्वार्थ सूत्र घुमते नव कंकरी सुगंधी
वंदू नऊ जिनायतन दहा दिशी सुनेत्रा
स्वाध्याय तप खरोखर पाहुड करी सुगंधी