मुक्तक … जीव
जन्म कुपात न सुपात भू वर
धरणीवर अश्विनात भू वर
हस्ताच्या कोसळत्या धारा
जीव झळकला तमात भू वर
…..
गझल … जीव स्वरूप
जन्मासाठी सूप निवडले
दिवा लावण्या तूप निवडले
चुस्त काफिया म्हणून गझले
मंडुकास प्रिय कूप निवडले
अर्घ्य द्यावया भगवंताला
भाव सुगंधी धूप निवडले
लष्कर पापांचे जाळाया
जिनानुयायी भूप निवडले
मातृधर्म पेलण्या सुनेत्रा
मी मम जीव स्वरूप निवडले
…