तांब्याभांडे घासूनीया धारेखाली ते खंगाळ
लिंबूमीठाने तैसेची स्नानासाठी हे घंगाळ
शेवंती पुफ्फे गुंफूनी अंबाड्याला फांती माळ
दो दो पिंडांना सोसेना खारे गोडे अश्रू ढाळ
मेतेताई लोकांच्या त्या राज्याची धानी इंफाळ
पुष्पांच्या आधी लावाया नावे रंगांची गंधाळ
सांभाळा हो बाबाबाई जीवा जीवांचा संसार
कामांधांनी नाही व्हावे भोगूनी बाल्या वंगाळ
लंब्याचौड्या गप्पाबाता भक्ती लोभी लोकांच्यात
गोष्टी छोट्या मोठ्या भारी शब्दांनी काया बंबाळ
अज्ञानी ढोंगी मूढांच्या नक्षत्रांचा पर्दाफाश
साधे सुट्टे रेखू द्यावे आंतर्जालाचे जंजाळ
अर्धोन्मीलीता दृष्टीने अर्हन्तांच्या धर्मा जाण
दो नेत्रांनी वर्षायाला आगीने कर्मांना जाळ
इच्छापूर्तीसाठी कर्मे आत्मा आहे साक्षीदार
अंतर्यामीच्या सिध्दाला भावे अश्रूंनी प्रक्षाळ
खोलीमध्ये भेटायाला आगे मागे नावे आड
नामांना वाचावे कैसे अंती आधी रे गुंजाळ
माधुर्याने चंद्रार्कांच्या ओळी रांगांच्या भांगात
सम्यग्दृष्टी जीवांसाठी डोई संभारा सांभाळ
पंड्या पाद्री जिन्ना मुल्ला सोनूताई साक्षी ग्रंथि
राऊळाच्या गाभाऱ्याला घंटा बांधाया वेताळ