चाललीस जाण्या पुढती ठाम निश्चयी तू
गाळले न अश्रू गाली ठाम निश्चयी तू
जाणलीस तत्त्वे साती ठाम निश्चयी तू
जाहला न वारा वैरी ठाम निश्चयी तू
भटकलास खेडोपाडी जाहलास योद्धा
अडकला न मोही जाली ठाम निश्चयी तू
गोड बोल बडबड गाणी रचत हसत गाशी
लावतेस सुंदर चाली ठाम निश्चयी तू
काजळून जाण्यासाठी जन्म तुझा नाही
चंद्र सूर्य तुझिया भाली ठाम निश्चयी तू
पाहतात उत्सुक डोळे उचलण्यास संधी
गडद गडद अधरी लाली ठाम निश्चयी तू
सहज सहज संवर आणिक कर्म निर्जरेने
भेटशील याची साली ठाम निश्चयी तू
तापतापुनीया गगनी कृष्ण मेघ भारी
धरेवरी येतो खाली ठाम निश्चयी तू
जेरबंद साडीवाला आवळून नाड्या
आत्मशरण साडीवाली ठाम निश्चयी तू
पाळलेस दोन नय जसा चोख धर्म जैनी
जाहलीस जय निर्वाणी ठाम निश्चयी तू
वाटिकेत भुंगा जैसा लहरतो हवेवर
तोच बाज सहजी जपशी ठाम निश्चयी तू
मूलभूत संस्कारांची प्रकृती अहिंसक
उमटलीय पाऊलांतुन ठाम निश्चयी तू
काय घ्यायचे अन कैसे ज्ञान आगमातुन
दावतेस पाल्यांनाही ठाम निश्चयी तू
रंगरूप घाटाचा तव मोह तापश्यांना
खिरवतोस तेंव्हा वाणी ठाम निश्चयी तू
ताणलेस व्यवहारा पण रोखले कधी ना
पाहिली सुनेत्रा ऐसी ठाम निश्चयी तू