पार दराच्या ऊस टणक
घटाहून मम मूस टणक
धारा गोठून कोसळती
मुसळासम पाऊस टणक
गझल गुणाची मृदुल टिके
रशियन व्याक्रण रूस टणक
तूच तुझे घर पोखरले
नारी नसते घूस टणक
कालाब्द्धीसह अर्था जाण
द्रव्यक्षेत्र अन कूस टणक
अष्टापद कैलास गिरी
नऊ रसांचा ज्यूस टणक
बदल सुनेत्रा ठामपणे
कायम नच होऊस टणक