देश मूक जाहलाय मौन ना
पेटलीय भूक आज चौर्य ना
कापुनी नखे सुयोग्य रंगवा
राहता नखात घाण हौस ना
काफिया स्वरात शोध घेतसे
गंडल्या अलामतीत मौज ना
नाव काय दफ्तरी लिहायचे
गाजल्या सभा गतात चौक ना
दगड पुफ्फ पापण्यांस चिकटता
जाण हक्क घेत देत कौल ना
कोरफड कुवार गौर लेखणी
तरु लहानसे महान पौर ना
चित्र गुप्त जाहल्यावरी कळे
सी समुद्र चंद्रगुप्त मौर्य ना