तीन रुबाया
एकल…
वड्यास एकल कधी न खावे खावे पावासंगे
नाहीतर मग युद्ध प्रकृती कफ पित्ताचे रंगे
छातीमधुनी घशात येता खोकुन खोकुन ठसके
लसुण पाकळ्या चावुन खाव्या कोमट पाण्यासंगे
दवांई …
हरित पीत अन श्वेत कफाने वात आणला बाई
वैद्यांचा मग घे तू सल्ला सत्त्वर कर घाई
छातीमध्ये न्युमोनियाची जाळीवर जाळी
टाळशील जर पथ्य दवांई हाडी भरेल वाई
धात्री…
स्वप्न निरामय आरोग्याचे पाहू बाळांसाठी
सुयोग्य संस्कारांनी त्यांना दीक्षित करण्यासाठी
अक्षर ओळख करून घे तू जगत जन्मदात्री
कुटुंब जपण्या घराघरांतुन स्वस्थ रहावी धात्री