महागाई …
शेपू चाकवत कांदापात
चुका चवळई टमाटर भात
मेथी करडई कोथिंबीर
महागाईनं आणला वात
खाऊगल्ली …
खाऊगल्ली गल्ल्या बोळे
पत्रावळी अन शेणगोळे
साफ सफाईनं तोंडा फेस
कर्मचाऱ्यांची काटे रेस
डंडाथाळी…
चिकन मासळी अंडा थाळी
मटण भाकरी हंडा थाळी
वाजवायला थाळी डंडा
एक नंबरी फंडा थाळी
मुक्तक चारोळी मुक्तक /१६मात्रा