दोन प्रहरी घे विसावा मारवा टाळू गडे
कोळशाच्या शेगडीवर सार वाफाळू गडे
ऊन आले बागडाया परसदारी अंगणी
थांबल्या पाऊस धारा गारवा गाळू गडे
घार भांडिक मोर शामा अन गवय्या गावया
पाखरांना घाल दाणे पारवा पाळू गडे
जाहली मळणी उफफणी ये भरू पोती नवी
बोर पपई ऊस चोरा खा रवा चाळू गडे
वाळवंटी कारखाना चालवाया रेतिचा
यंत्र जम्बो पातले त्या चारवा वाळू गडे
माजलेले उपटुनी तण हात मळले लेकरा
बहरले पण मैत्र मैत्री यार वा शाळू गडे
ऐकणारी श्राविका मी जाणते हित करु म्हणे
बादरायण अंधश्रद्धा ठार वा क्षाळू गडे
मैफिलीला रंग चढला दीप सारे पेटले
भैरवीची बात सोडू कारवा माळू गडे
कागदी पुफ्फे “सुनेत्रा” माळ गजरा गुंफुनी
अत्तराने भिजव धागा हार वासाळू गडे