श्रीमंधर ज्येष्ठ नव तीर्थंकर भावी
मी समर्थ रक्षिण्या आत्मधर्म स्वामी
दीप शांत तेवती तराईत मौनी
शालु कंच पाचुसम शाल निळी ल्यावी
अंगांगी निवडुंग शिशिर बहर नेत्री
सृष्टीने तनूवर शाल हरित ल्यावी
ऋतु शिशिर तपोलीन नासाग्री दृष्टी
आस्थेला ना बाजु उजवी वा डावी
गुणानुराग झेले क्षमाशील सृष्टी
वारा हळु फिरवतो जलदांची चावी
शिशिरांकित निवडुंग भिने रोमरोमी
बर्फाच्या चषकात सोलकढी प्यावी
मन सुनेत्र हिमनेर सुचिपर्णी गात्री
घुंगूररव निर्झर तट गुरे चरावी