-
तीर्थंकर – THE LORD
-
स्वर चारोळी – FOUR LINES POEM
-
घटाटोप – OVERCAST
घटाटोप … आभाळाच्या शिरी शोभतो घटाटोप जलदांचा पाऊस पाडाया धरणीवर खटाटोप जलदांचा डोंगरमाथ्यांवरती धोधो कोसळती जलधारा सत्य शिवाच्या सुंदरतेवर जटाटोप जलदांचा कृष्णमेघ… धरतीवर जणु कलश घड्यांचे कृष्णमेघ झरती भरुन वाहती जोहड धरणे कृष्णमेघ झरती चिंब जाहली भिजुन मृत्तिका निर्झर खळखळतो मधुर तराणे कृतज्ञतेचे कृष्णमेघ झरतो रुमाल… ज्येष्ठामधल्या नक्षत्रांची कमाल जादूई लक्ष लक्ष घन गर्द ढगांचा…
-
कारण – REASON
कारण साधारण जगण्याचे कारण पण कारण जगण्याचे ठोकायाला असो कुणीही कारण ते आरण जगण्याचे हवेच कारण सदैव हृदयी कारण ना तारण जगण्याचे ग्रह ताऱ्यांचे खगोल शिकण्या कारण कर धारण जगण्याचे भाव अधिक ज्येष्ठाच्या नंतर कारण मधु श्रावण जगण्याचे आषाढाच्या नाजुक लेकी का रण पाचारण जगण्याचे ..? जाण सुनेत्रा शरण्य आत्मा कारण हे सारण जगण्याचे
-
ओझल – OUT OF SIGHT
-
झाडे लावू – LET US PLANT TREES
दोन मुक्तके उखळ … उखळात धान कांडा म्हणतेय मुसळ बाई डोळ्यातले स्वतःच्या काढून कुसळ बाई मटकी मसूर चवळी भिजवून ठेव रात्री उकळून घ्या सकाळी करण्यास उसळ बाई झाडे लावू … उखाळ्या पाखाळ्या करण्यात वेळ वाया जाई कुटाळक्या चहाड्या करण्यात वेळ वाया जाई चला झाडे लावू पाऊस मेघ वर्षायाला मस्तीत टवाळ्या करण्यात वेळ वाया जाई …
-
तपस्वी – FRIAR