Category: Marathi kaavya

  • अविस्मरणीय – AVISMARANIYA

    कसं लिहू काय लिहू म्हणता म्हणता लिहिती झाले प्याला दिला साकीने जो पोटामध्ये रिचवित गेले बरळत सुटले वाचत सुटले रडत हसत लिहित सुटले गझलांवरती गझलांचे मी सुंदर इमले रचत गेले रंगून गेले माझे इमले गगन अवघे चुंबीत गेले प्रेमिकांना अचंबीत करून स्वतःमध्ये रंगून गेले चुंबन कोणा  वंदनीय कोणाकोणाला  पूजनीय कोणा अगदी तिरस्करणीय! पण मन म्हणते…

  • शुभस्य शीघ्रम – SHUBHASYA SHEEGHRAM

    इतुक्या सुंदर भूमीवरती जगावयाला मिळते आहे भाव फुलांचा तयात दरवळ भरावयाला मिळते आहे लाल असुदे अथवा काळी भूमी प्रसवे वृक्ष लतांना उलते फुलते अंकुर जपते उदरभरण प्राण्यांचे करण्या काठावरती वसोत वाड्या सरिता दुहिता अखंड वाहो नीर तिच्यातील शुद्ध ठेवण्या मती आमुची तत्पर राहो अभयारण्ये हिरव्या राया वन्य जिवांना मुक्त फिराया प्रकृतीतल्या अन्न साखळ्या रहो सलामत…

  • ऐक उखाणे हे माझे – AIK UKHAANE HE MAAZE

    अनवट कोडे नकोस घालू ऐक उखाणे हे माझे ऐकशील तर सुटेल कोडे गाशील गाणे तू माझे माझे माझे म्हणशिल तर ते खरेच होइल तुझेच रे तुझ्यासवे मी गाताना ते म्हणतिल सारे हे अमुचे ऐकत ऐकत गात नाचतिल कैक दिवाणे ते अपुले अनवट कोडे तुझे न माझे खरेच सजणा हे माझे नाव गुंफले ज्यात आपुले ऐक…

  • अक्षर माझे – AKSHAR MAZE

    वाटुन पाला मी मेंदीचा तळहातांना रंगविले जास्वंदीच्या चुरुन पाकळ्या गालांना मी रंग दिले तेल तुपाची धरुन काजळी नेत्र पाकळ्या लांबविल्या विडा चघळुनी त्रयोदशगुणी अधर पाकळ्या खुलविल्या जाइजुईचा गजरा गुंफुन सुवासिक मम कुंतल झाले निशिगंधाचा सुगंध प्राशुन तनमन अवघे पुलकित झाले शुभ्र मोगरा हिरवा चाफा भूचंपक तो जर्द जांभळा दौतीमध्ये भरण्या शाई प्राजक्तासम टपटप झरला मोरपिसाची…

  • ध्रुव तारा – DHRUVA TAARAA

    कैकवेळा नाव लिहिले खोडलेही कैकदा पण पहाटे साद घाली ध्रुव तारा हासरा मी कधी होते तुझी अन मी कधी माझीचरे गुंतले नावात होते मी तशी साधीचरे नाव असुदे गाव असुदे गुंतलेली वासना आत्मियाशी फक्त जोडे शुद्ध सुंदर भावना मुग्धता प्रेमातली वा धुंद लाटा सागरी स्वर्ग मी हिंडून येते घेत त्या अंगावरी आज मी आहे इथे…

  • तुझी प्रिया – TUZEE PRIYAA

    नको म्हणू मज बदललीस तू अशीच आहे तुझी प्रिया नको म्हणू तिज घडवलेस तू अशीच आहे तुझी प्रिया घडवायाचे कुणी कुणाला जो तो घडतो स्वतः स्वतः प्रेमाने ती फुलते खुलते अशीच आहे तुझी प्रिया कुणी कुणाहुन नाही सुंदर कशास तुलना करिशी तू तुलनेने या कोमेजे ती अशीच आहे तुझी प्रिया गोड हासते खरे बोलते म्हणुन…

  • तुला देत आहे काही – TULAA DET AAHE KAHEE

    तुझे घेत आहे काही तुला देत आहे काही ।। मृदू पालवीने फुलतो पुन्हा पुन्हा फळतो रमतो नवे येत आहे काही तुला देत आहे काही… अंगणात नाचे वारे उघड खिडक्या सर्व दारे प्रेम नेत आहे काही तुला देत आहे काही… पाजु पाणी तरू रोपा बांधुयात घरटे खोपा वाळु रेत आहे काही तुला देत आहे काही… काव्यमळा…