-
कडप्पा – KADAPPAA
प्रीतीने भर भर ओटी वंदन दुहिते शत कोटी संथ वाहते संत मती नितळ वाहती नीर गती कांचन पाचूच्या मखरी पदर भरजरी निळी निरी काष्ठ स्तंभ दो कळस शिरी हिरवळ भूवर मुक्त सरी मुखचंद्रावर तेजस्वी भाव मनोहर ओजस्वी सरळ नासिका कृष्ण कळी काया झळझळ सोनसळी काळ कडप्पा उंबरठा मित्र जिवाचा पाणवठा सजल नेत्र घन भाव पहा…
-
जेव – JEV
शंका कशास कुठली निजभाव देव आहे शुद्धोपयोग जपणे ना देवघेव आहे पाऊल टाक पुढती रस्ता मिळेल सच्चा आत्म्यावरीच श्रद्धा कसले न भेव आहे चकली अनारशांचा दरवळ पिते रसोई रंगीत हे चिरोटे दुरडीत शेव आहे गाळून घाम जेव्हां होते कधी भुकेली रसनेंद्रियांस सुखवे तो शब्द जेव आहे जो तो जरी म्हणे मज ऐसीच तव तऱ्हा ही…
-
जंग – JANGA
भोवतीच्या रिंगणाला चालताना लंघ मित्रा तुज सदोदित रोखणारी वाहने कर भंग मित्रा घे भरारी ठोक भीती चुम्ब शिखरे पर्वतांची सोकलेले अंध मांत्रिक सोड त्यांचा संघ मित्रा कंच हिरवी लाल माती सप्तरंगी इंद्रधनुतिल लाव दुजाला स्वतःला भावती ते रंग मित्रा गाल गाल लगावलीची शेर बब्बर धीर सांगे गोष्ट मैत्रीची खरी पण चंट चालू तंग मित्रा धर्म…
-
अधिक -ADHIK
वनदेवीच्या वनात जागा आपण पाहू वनदेवीच्या रणात बागा आपण पाहू भरले जे जे कषाय तू जे अंतर्यामी वनदेवीच्या तनात रागा आपण पाहू फुलाफुलांवर कळ्याकळ्यांवर रंग दुपारी पावसात पण सौरभ प्राशत दंग दुपारी रंगबिरंगी छत्रीमध्ये पाऊस धार अधिक श्रावणी चिंब चिंब मम अंग दुपारी मनपसंत या हवेत फिरुया गाऊ गाणे पाकोळ्यांसम मजेत उडुया गाऊ गाणे गझल…
-
खलास – KHALAAS
खलास … मुक्तक खलास करते रण अतिरेकी डोके एखादे खलात कुटते चिकणि सुपारी डोके एखादे गडे काफिया मुक्तकातला ओळख सुंदर रफार ई वर जणु वेलांटी डोके एखादे अलबेली … मुक्तक जशी टोकरी हवी हवेली हवी तशीच मैत्री मज अलबेली हवी कुसुमांकित तनु पर्ण चित्र पाऊस अशीच छत्री कवीस वेली हवी
-
खरेदी – KHAREDEE
असा मी असामी न कासव ससा मी कराया खरेदी उघडला कसा मी जपायास जीवा हिताचा वसा मी उठवते वहीवर मनाचा ठसा मी मनाला सुनेत्रा धुते खसखसा मी
-
ई मेल – E MAIL
जुना पुराणा नेल कटर धार पुन्हा परजेल कटर कराकरा कापुन टाळा शटर नवे उघडेल कटर गंज ब्लेडच्या पानांचा पुन्हा पुन्हा खरडेल कटर खोचुन बोथट सुरे बिरे सीट कव्हर फाडेल कटर तत्त्वार्थातिल सूत्र धरुन जीवाला जगवेल कटर भीतीची झटकुन झुरळे असत्त्यास मारेल कटर वेळ सुनेत्रा मम साधुन पाठवेल ई मेल कटर