घटाव – GHATAAV


आत्मप्रदेशी तरंगणारा तणाव माझा
सबब अहिंसेकडेच आहे झुकाव माझा

मणी असूदे अथवा पाते दांड्याविन ते
घुसळण होण्या पृष्ठावरती दबाव माझा

घाटदारला शब्द बोलिचा घटाव सुंदर
अर्थ काढणे स्वतःस हितकर सराव माझा

शोध मुमुक्षु मणी तळी जो रुतून बसला
अज्ञानी मूढांना लागे न ठाव माझा

काकडारती केका घन्टा बांग नमोस्तू
शुभ भावांच्या भरतीमधुनी उठाव माझा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.